Going to Matara


Advertisement
Sri Lanka's flag
Asia » Sri Lanka
December 8th 2016
Published: July 6th 2017
Edit Blog Post

Geo: 7.87305, 80.7718

८.१२.२०१६

आज सिनॅमन हॉटेल टिसामहारामा वरून जगाबे हॉटेल वेलीगामा येथे जायचे. कोस्टल रोड वरून प्रवास आहे. हिन्दी महासागर. आज काही पहाण्यासारखे नव्हते. प्रवास हि कमी होता. आज नेहमी प्रमाणे ९.०० वाजता तयार होतो. पण अॅन्थनी ( एअरवे चा कर्मचारी जो गाइड कम क्लीनर होता तो तयार नव्हता. त्याचा इरादा होता की तेथेच हॉटेल वर वेळ काढून मग निघून वेलीगामा ला जावे. पण हे त्याने स्पष्ट सांगातले नाही. भाषा प्राॅब्लेम. खर तर Cinnaman Hotel खूप छान होते. आम्हाला मागे गॅलरी तून खाडीचा view होता. तिथे बरेच पक्षी दिसत होते. खंड्या पक्षी सूर मारून मासा पकडून उडाला. निघायच्या घाईमुळे आम्ही हॉटेल नीट पाहिले सुद्धा नव्हते . मस्त स्विमिंग पूल होता. आधीच सांगितले असते तर सगळ्यांनी आनंद घेतला असता. परंतु तयार असल्याने आम्ही हॉटेल सोडले.

काही पहायचे नव्हते. गाडी फारच लवकर म्हणजे ११.५० लाच हॉटेल जगाबे ,वेलीगामा येथे पोहोचली. येताना मतारा येथे समुद्रात बेटावर एक मंदिर दिसले होते. आम्ही फोटो घेण्याचे सांगूनही गाडी तशीच पुढे दामटली होती. आता लवकर पोहोचलो तर दोन रूम तयार नव्हत्या. सर्वांनी कलकलाट करून गाडी परत मतारा येथे न्यावी असे सांगितले. तेथे शाॅपिंग साठी बरीच दुकाने दिसली होती. सर्वजण कपडे व पर्स / बॅग ची खरेदी करत होते. नागदीप मंदिर त्या टूर मध्ये नव्हते पण त्याने ते
दाखवले असे त्याचे म्हणणे होते. पण ते साळुंके यांनी त्यांना टूर मध्ये समावेश करायला सांगितले होते. साळुंके यांचे कनेक्शन चेन्नै एजंट शी होते. त्याचे श्रीलंकेच्या एजंटशी होते. आता श्रीलंकेच्या एजंट च्या परवानगी शिवाय तो गाडी काढायला तयार नव्हता. शेवटी चेन्नै व श्रीलंका एजंटां चे बोलणे होऊन गाडी मतारा ला निघाली.

प्रथम त्या बेटावरच्या बुद्ध मंदिरात गेलो. पुलावरून चालत समुद्रावरुन जायचे. तेथे बुद्ध मंदिर आहे. बुद्धाचे केस व दात तेथे ठेवलेले आहे. त्या यंत्रावरुन फिरून येणारा पवित्र सफेद दोरा भिख्खु सर्वांना बांधत होता. तेथे स्तूप आहे. जेवून परत हॉटेल वर आलो. सर्वांना रूम मिळाल्या.मस्त रुम आहे. गॅलरीतून समुद्र दिसतो आहे.आज काही प्रोग्राम नाही. बीच वर फिरायचे भिजायचे. आमच्या रूम वरून सूर्यास्त पाहिला. रात्री पाण्यात लाटांमध्ये पाय भिजवले. जेवून परत एकदा समुद्रावर जावून आलो.


Additional photos below
Photos: 10, Displayed: 10


Advertisement

Coconuts on terraceCoconuts on terrace
Coconuts on terrace

Coconut trees have been given way through the construction of floors of resort. Through balcony, staircases the way is given them to rise.


Tot: 0.101s; Tpl: 0.01s; cc: 8; qc: 45; dbt: 0.0379s; 1; m:domysql w:travelblog (10.17.0.13); sld: 1; ; mem: 1.1mb