Towards Yela National Park


Advertisement
Sri Lanka's flag
Asia » Sri Lanka
December 7th 2016
Published: July 6th 2017
Edit Blog Post

Geo: 7.87305, 80.7718

७.१२.२०१६

नुवारा इलिया वरून काथरागामाकडे प्रयाण. काथरागामा हे हिंदु बौद्ध मुस्लिम व श्रीलंकन लोकांचे धार्मिक ठिकाण आहे. वाटेत सिताइलिया येथे हनुमान मंदिरास भेट दिली. तेथे पाण्यात मिळालेल्या राम सीता लक्ष्मण मूर्ति पूजेत आहेत. असे सांगतात की येथे रावणाने सितेला ठेवले होते. व हा अशोक वनाचा भाग आहे. येथील धबधब्यात सिता आंघोळ करत असे. तेथे मोठी मोठी पावले सद्रृश खड्डे आहेत ती हनुमानाची पावले. असे ही म्हणतात की सीतेने शाप दिल्याने येथे गवताशिवाय काही उगवत नाही. तसेच सितेच्या अश्रूंनी तयार झालेला एक तलाव ही आहे. हा आम्हाला नाही दाखवला.

थोडे पुढे गेल्यावर एक धबधबा लागतो तो रावण धबधबा . रावन इला . तेथे दगड विकायला होते. कलर्ड .आम्ही ही घेतले. पुढे हंगाला येथे उतरलो. तेथे अशोकवन आहे. तेथे आता बोटॅनिकल गार्डन आहे. त्याची प्रत्येकी १५०० श्रीलंका रूपये फी ऐकून अर्धे लोक बाद झाले. १००० रू देवून ७ जणांची गाडी ही घेता येते. पण गाडीवाल्याला हिंदी किंवा इंग्लिश येत नसल्याने आम्ही पण बाद.

आज जेवणानंतर वली- कार्तिकेय ची दुसरी पत्नी चे जन्मस्थळ पहावयास निघालो. प्रथम गणेश मंदिर पाहिले. मग वलीचे जन्मस्थळ. हे एक मंदिर आहे. आपणास आत प्रवेश नाही. तेथील पुजार्या ने गोष्ट सांगातली. वलीचे पालन पोषण एका काळवीट व हरिणीने केले. जेव्हा आ s sद्य शंकराचार्य तेथून जात होते
तेव्हा त्यांना अर्भकाच्या रडण्याचा आवाज आला. आत जाताच त्यांना हरिण दांपत्य बाळाची काळजी घेत असलेले दिसले. ती मोठी झाली तेव्हा तिने कार्तिकेयाबद्दल ऐकले व त्याच्याशीच लग्न करायचे ठरविले. शंकर कार्तिकेयाला नेहमी दुसरा नंबर देत असल्याने तो नाराज होऊन पृथ्वीवर आला. त्याची बायको देवयानी बरोबर होती. पण शंकर दोघांनाही स्वर्गात बोलवत होते. काही दिवसांनी ती स्वर्गात निघून गेली.कार्तिकेय सैरभैर होऊन आत्महत्या करण्याच्या विचारात होता. तेव्हा शंकराचार्य त्याला भेटले. इथे वली एका पायावर उभी राहून कार्तिकेय प्राप्ती साठी तप करत होती. तिचा पाय मातीत रूतला व त्याचे vibration कार्तिकेय पर्यंत पोचले. तो शोधत आला व दोघांचे लग्न झाले. ती तपाची जागा व पाऊल दाखवले.

तेथून पुढे कार्तिकेय मंदिर कडे निघालो. मंदिर ६ वाजता उघडत असल्याने थांबावे लागले. इथे गणेश मंदिरात कल्याण चे एक गृहस्थ पुजारी आहेत. त्यांचीही एक स्टोरी. ते घरून पळून येवून येथे आले. साळुंकें च्या एका श्रीलंका टूर मध्ये त्यांचा भाऊ होता. जेव्हा ते या देवळात आले तेव्हा दोन भावांची भेट झाली. साळुंके त्यांच्यासाठी चेन्नै वरून बरेच पापड घेऊन आले होते. आपल्याला येथे फक्त गणेश व कार्तिकेय चे पडदे दिसतात. पुजारी पडद्यामागे जावून पूजा करतात व मग प्रसाद देतात. इथे लोक प्रसादाला फळे देतात व मंदिराबाहेर फळांची मोठी ताटे घेऊन उभे रहातात.फळे संपेपर्यंत. साळुंकें नी आधीच सांगातले होते की फळे घ्यायची. आम्ही बाहेर निघालो तेव्हा आरतीची वेळ झाली होती व भाविक फळांनी भरलेली मोठी ताटे घेऊन मंदिरात जात होते.

हॉटेलकडे जाणारा मार्ग येला नॅशनल पार्क मधून जात होता. बरेच मोर दिसले. मोराचा नाच ही गाडी थांबवून पाहिला. बाकी हत्ती वगैरे काही नाही. तिथले बुद्धाचे मंदिर लांबून गाडीतून दाखवले. मग सिनॅमन हॉटेल ला पोहोचलो. हॉटेल छान आहे. रूम वर गेल्या गेल्या मोठा पाऊस आला. अर्धा तास पडत होता. हॉटेल ने बाहेर टेबले व डिशेस मांडली होती. त्यांची पळापळ झाली. रूम ला बाल्कनी होती ती खाडी चे छान दृश्य दाखवत होती.याचे जेवण छान.



Additional photos below
Photos: 14, Displayed: 14


Advertisement



Tot: 0.226s; Tpl: 0.014s; cc: 5; qc: 45; dbt: 0.1519s; 1; m:domysql w:travelblog (10.17.0.13); sld: 1; ; mem: 1.2mb