Going to Nuwara Elia


Advertisement
Sri Lanka's flag
Asia » Sri Lanka
December 6th 2016
Published: July 6th 2017
Edit Blog Post

Geo: 7.87305, 80.7718

६.१२.२०१६

आज कॅन्डीवरून नुवारा एलिया या थंड ठिकाणी जायचे. सकाळचा नाश्ता ही छान होता. बरेच पदार्थ होते. अम्मा गेल्याची न्यूज आली होती. आज हनुमान मंदिर पाहिले. श्री भक्त हनुमान मंदिरRambodha . श्री हनुमान ने सीता देवी शोधात असताना ह्या पवित्र डोंगरावर आपले पाय ठेवले. हनुमानाचा एक प्रचंड पुतळा Chinmayananda मिशन ने एका डोंगराच्या माथ्यावर उभारला . १ ते १.५ किमी चा चढ आहे. रिक्षा ही जातात. पायथ्याकडून व्हॅली चे निसर्गरम्य सुंदर द्रृश्य दिसते. आम्हाला मंदिराची आरती व प्रशाद मिळाला.

परत चढ उतरलो. नुवारा एलिया रस्त्यावर बरेच चहाचे मळे आहेत. आम्ही एका टी फॅक्टरीला भेट दिली. GLENOCH.

आजही दुपारीच हॉटेल ला पोहोचलो. विंडसर हॉटेल. त्यांनी ताडगूळाचा खडा देऊन चहा दिला. ताडगूळ तोंडात ठेवायचा व चहा प्यायचा. त्यांच्याकडे नाताळासाठी गोठा सजवत होते. तिथल्या दोन गोष्टी विशेष आवडल्या. खुर्ची जिच्यात दोघांना समोरासमोर बसून गप्पा करता येतील. तसेच फुलदाणी ठेवलेली ट्रॉली. दुपारी बाजार फिरलो.रात्री कॅन्डल लाईट डिनर होते.



Additional photos below
Photos: 10, Displayed: 10


Advertisement



Tot: 0.097s; Tpl: 0.01s; cc: 9; qc: 28; dbt: 0.0217s; 1; m:domysql w:travelblog (10.17.0.13); sld: 1; ; mem: 1.1mb