To Kandy


Advertisement
Sri Lanka's flag
Asia » Sri Lanka
December 5th 2016
Published: July 6th 2017
Edit Blog Post

Geo: 7.2955, 80.6356

५.१२.२०१६

आज कँडी ला जायचे. सकाळी फोटो काढताना चुकून एक अल्बम डिलिट झाला. त्यातील काही गुगल फोटोत सेव्ह केले असल्याने मिळाले. पण आदल्या दिवशीचे सर्व गेले. सिगरिया फोर्ट पायथ्याकडून पाहिला. हा वर्ल्ड हेरिटेज वास्तु आहे. राजा कश्यप ने हा बांधला असे म्हणतात.

त्यानंतर प्रथम प्रेमदासा ज्वेल्स मध्ये गेलो. त्यांनी एक मायनिंग पासून फायनल ज्वेल्स होण्याच्या प्रोसेस चा सिनेमा दाखवला. मग राँ व फायनल ज्वेलस् पाहिले. खरेदी साठी स्टोन्स जास्त होते . त्यांचे सोने चांगले वाटत नव्हते.

तेथून पुढे मटाले येथील स्पाइस गार्डन ला गेलो. हिंदी डॉक्टरने गाईड केले. त्याने सांगितलेली herbal medicines चांगली वाटली तरी खूपच महाग होती. लवंग दालचिनी पण खूप महाग असल्याने कोणीच काही घेतले नाही.

दुपारीच क्विन्स हॉटेल, कँडी येथे आलो. हे खूप जुने हॉटेल आहे. इंग्लंड ची राणी इथे राहून गेली आहे. जुने जिने, लिफ्ट, झुंबरे ,पंखे सारे जतन करुन सुस्थितीत ठेवले आहे. बाजूला लेक आहे. रुम मधून लेक चे सुंदर द्रृक्ष्य दिसते. दुपारीच आल्याने आजूबाजूला दुपारच्या जेवणा निमित्ताने भटकून घेतले. कॅन्डी चे दुपारचे जेवण एका व्हेज हॉटेलात झाले. येथे सर्वच ठिकाणी डोसे, मेदूवडे व शेवई इडल्या तुमच्या पुढे आणून ठेवतात. तुम्ही पाहीजे ते घ्यायचे . बील देताना काय घेतले ते सांगून बील ध्यायचे. आम्ही गरम डोसा फ्रेश सांगितल्याने तसा तो मिळाला.

तेथे ५.००
वाजता श्रीलंकेचा सांस्कृतिक कार्यक्रम ( Awan Hula) असतो. खरे तर हा हॉटेल पासून जवळ होता. पण आमची चुकामुक झाली. आम्ही त्यामुळे रिक्षा घेतली व रिक्षा वाल्याने आम्हाला कॅन्डी लेक क्लब च्या कल्चरल प्रोग्रॅम ला नेले. SLR 1000 तिकीट होते. मुखवटे घालून थिम नुसार नाच होते शेवटी आगीचे खेळ दाखवले व आगीवरून चालले. आम्ही चालत हॉटेल ला परत आलो. मार्ग वर जवळच्या सांस्कृतिक कार्यक्रम ठिकाण दिसले. जवळच बुद्घाचे मंदिर आहे. टेंपल ऑफ टूथ रेलिक. Temple of the Sacred Tooth Relic बाहेरून हे पाहिले. रात्रीचे जेवण ही छान होते. डिनर मध्ये २४१ आयटम होते असे प्रभुदेसाई बाई ने सांगितले.


Additional photos below
Photos: 6, Displayed: 6


Advertisement



Tot: 0.05s; Tpl: 0.01s; cc: 9; qc: 24; dbt: 0.0224s; 1; m:domysql w:travelblog (10.17.0.13); sld: 1; ; mem: 1.1mb