Towards Nigambo


Advertisement
Sri Lanka's flag
Asia » Sri Lanka » Southern Province
December 9th 2016
Published: July 6th 2017
Edit Blog Post

Geo: 6.25361, 80.2981

९.१२.२०१६

नाश्ता करून जगाबे हॉटेल सोडले. आजही परत कोस्टल रोड. काल साळुंकें नी सांगितले होते की तेथे मच्छीमार खांबावर बसून मासेमारी करतात. तसेच सर्फिंग करणारे ही दिसतात. पण आम्हाला हे काही पहायला मिळाले नाही. निगोंबो ला निघालो. हिंदी महासागर. आजही मच्छीमार नाहीच दिसले.

रूमासाला येथे द्रोणागिरी पर्वताचा भाग आहे. Unawatuna. वसाहती युग मध्ये ते 'Buona विस्टा' (आनंददायी दृश्य😉 म्हणून ओळखले जात होते. इतिहास 'रामायण' 'Rumassala' भारतातील हिमालय पर्वत एक भाग आहे असे घोषित करतो. गुगलवर मिळालेली mysterious माहिती गुगल वरून साभार:” Sir Arthur C. Clarke has stated that, spot in this region does not come within the magnetic field that envelops the whole earth. In consequence, Sir Arthur explains, that, Exhausted geo-stationary satellites end up high above this place around Unawatuna, and keep on milling round and round.”येथे मारूतीची मूर्ति आहे. तेथे आता बुद्धाचा Peace Pagoda बांधला आहे. येथून समोर गाले फोर्ट दिसतो. दीपगृह दिसते. येथे सीतेची गुहा आहे असे कळल्याने ते शोधत निघालो. तेथे विरूद्ध बाजूला एका गुहेत सीतेची मूर्ति आहे.आधी मारूती ची मूर्ति तसेच रामासारखी दिसणारी रावणाची मूर्ति आहे. इतरही बरेच पुतळे आहेत. बुद्धाचा पॅगोडा आहे. शयनावस्थेतील बुद्ध आहे.

रूमासाला वरून गॅले फोर्ट ला आलो. बसमधूनच गॅले फोर्ट ची सैर घडवली. मग दीपगृहा कडे उतरवले.
मग आम्ही तटावरून चालत निघालो. आम्हाला इथे न्यूली मॅरीड कपल दिसले. सर्वांनी त्यांना रिक्वेस्ट करून फोटो घेतले. समुद्र खूप छान आहे . हिरवी छटा आहे. येथून आम्ही द्रोणागिरीचे फोटो काढले. गॅले डच किल्ला हे स्थानिक आणि परदेशी पर्यटकां चे सर्वाधिक स्वारस्य आहे. श्रीलंका मध्ये युनेस्को जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आले. किल्ला पहिल्याने इ.स. 1588 मध्ये पोर्तुगीजांनी बांधला.गॅले क्रिकेट ग्राउंड प्रवेशद्वार जास्त पर्यटकांच्या गर्दी चे असते. गॅले किल्ला मंदिर, गॅले किल्ला मशीद, गॅले किल्ला प्रकाश घर, सागरी संग्रहालय, किल्ला ग्रंथालयातील अँग्लिकन church. प्रवाळी समुद्र जैव विविधता आहे. भाकरी फळ वृक्ष आहेत. (नीर फ़णस😉

बस मधून एक्स्पेस वे पकडून दहिवाला येथे आलो. एका व्हेज रेस्टाॅरंट मध्ये जेवलो. येथे गरमागरम वडा मिळाला. दहीवाला येथे दक्षिण पूर्व आशिया खंडातील सर्वात मोठे प्राणीसंग्रहालय एक राष्ट्रीय प्राणीशास्त्रविषयक गार्डन्स. प्राणी, पक्षी आणि सरपटणाऱ्या मोठ्या संग्रह आहे. मग प्राणी संग्रहालय भेट. रू७००. हे खूपच सुंदर आहे. विविध प्राणी पक्षी आहेत. सर्व active वाटले. हत्तीचा शो पाहिला.

मग कोलंबो मार्गे निगॅम्बो येथे निघालो. संध्याकाळची वेळ असल्याने ट्रॅफिक जॅम होता. आज ट्रेन पाहिली. आपल्या सारखीच लोंबकळणारी माणसे होती. समुद्राला समांतर रूळ आहेत.

रॉयल हॉटेल ला पोहोचलो. भात न दिल्याने व खारट भाजी असल्याने वादावादी झाली. शिवाय साळुंकेंचा प्रोग्रॅम बदलून कोलंबो शहर दर्शन रद्द केले होते. परत चेन्ने एजंट श्रीलंका एजंट फोनाफोनी होऊन मार्ग निघाला.


Additional photos below
Photos: 26, Displayed: 22


Advertisement



Tot: 0.24s; Tpl: 0.017s; cc: 7; qc: 51; dbt: 0.1553s; 1; m:domysql w:travelblog (10.17.0.13); sld: 1; ; mem: 1.2mb