Mahabodhi Vriksha, Jafana


Advertisement
Sri Lanka's flag
Asia » Sri Lanka
December 3rd 2016
Published: June 19th 2018
Edit Blog Post

Jaffna, Northern Province, Sri Lanka
Saturday, December 3, 2016



३.१२.२0१६

आज ७.३0 वाजता छान नाश्ता करुन हॉटेल सोडले. रस्त्यात ४000 रूपयाचे श्रीलंकन रुपी करुन घेतले. ८००० रुपये मिळाले. आज बोधी वृक्ष पहायचा होता. अनुराधापूर मध्येच आहे. आहे. अशोका ची मुलगी संघमित्रा व मुलगा महेंद्र यांनी बौद्ध धर्माचा प्रसार लंकेत केला. अशोका ची मुलगी संघमित्रा हिने बोधगया वरुन बोधी वृक्षाची फांदी आणली व श्रीलंकेत रुजवली तो हा बोधीवृक्ष. खाली प्रदक्षिणा घालण्यास पाथवे आहे. हा बराच मोठा परिसर आहे. तेथून पुढे रुवनमाली महास्तूप आहे. बरीच तंगडतोड करावी लागते. सफेद रंगाचा हा स्तूप प्रचंड मोठा आहे. सकाळ च्या उन्हात तो आकाशाशी मिळून गेल्याचा भास होत होता. त्यावर सकाळी सुद्धा पक्षी (Bats) उडत होते.

स्तूप पाहून जाफनासाठी बसने निघालो. रस्ताभर डोळ्यांना हिरव्या रंगाची मेजवानी होती.आजचा प्रवास खूपच जास्त होता. आज जेवण दाउद धाब्यावर घेतले. तेथील थंबी ज्याला मोगँबो नाव दिले स्वभावाने चांगला माणूस होता.पुढे आम्ही किलीनोच्ची येथील LTTE ने फोडलेला वॉटर टॅंक पाहिला. (गुगल वरून साभार : During the final stages of the operation, the LTTE was forced to flee from their self claimed administrative capital of Kilinochchi. On the 31st December 2008, the LTTE destroyed the massive water tank witch fed the whole city of clean drinking water just before fleeing the city. Being in the dry zone, water was a scarce commodity for all the tamil civilians in Kilinochchi. This fallen water tank today lies as it fell as a monument to the ruthlessness of the war.)

थोडे पुढे रस्त्याच्या उजव्या लेनमध्ये प्रभाकरन चे घर आहे असे सांगितले. पुढे ‘Elephant Pass Monument’ बस मधून पाहिले. असे सांगण्यात आले की या लश्कर ठाण्यावर LTTE चा बुलडोझर जो टॅंक प्रमाणे दिसत होता असा अनेक शस्रे व स्फोटकां नी भरला होता , चालून येत होता. LTTE च्या सैनिकांनी ही गराडा घातला होता. गामिनी कुलरत्ने या सैनिकाने दोन्ही हातात ग्रेनेड घेउन टॅंक वर चढून त्यात ग्रेनेड फेकले. स्फोट होउन LTTE चा प्रयत्न फसला. त्याचा पुतळा तेथे टॅंक च्या अवशेषां सह आहे.

जाफनाच्या हॉटेल ग्रीन ग्रास मध्ये मुक्काम होता.आज लवकर पोहोचल्याने महिला वर्ग खरेदी साठी उत्सुक होता. जाफना मार्केट साठी चालत निघालो. रस्ता विचारताना कळले की मार्केट ५.३० लाच बंद झाले होते. त्यामुळे वळून परत हॉटेल चा रस्ता धरला. हॉटेल जाफना रेल्वे स्टेशन ला लागून होते. आत जावून भटकून आलो. मग हॉटेल ला परत. इथे वायफाय कनेक्शन छान होते.


Additional photos below
Photos: 13, Displayed: 13


Advertisement



Tot: 0.119s; Tpl: 0.011s; cc: 8; qc: 48; dbt: 0.0414s; 1; m:domysql w:travelblog (10.17.0.13); sld: 1; ; mem: 1.1mb