Visit to Nainativu


Advertisement
Sri Lanka's flag
Asia » Sri Lanka » North Central Province
December 4th 2016
Published: July 6th 2017
Edit Blog Post

Geo: 8.45732, 80.5438

४.१२.२०१६

आज जाफना हून निघून नैनातिउ या बेटावर जायचे होते. श्रीलंके मध्ये बरीच बेटे आहेत. बसने निघून कुरिकड्डूवान या ठिकाणी जावून तिथे बोट घेउन नैनातिऊ या बेटावर जायचे. येथे हिंदूंचे नागदीप मंदिर व बौद्धांचे मंदिर आहे. बोट पोहोचायला १०-१५ मिनिटे लागतात. हॉटेल पासून कुरिकड्डूवान (बोट थांबते तिथे ) जाणारा रस्ता खाडी वरुन जातो. आम्हाला अनेक प्रकारचे समुद्र पक्षी, गरूड दिसले. येथून बोट पकडून नैनातिऊ येथे उतरलो. आम्ही पहिल्या थांब्यावर उतरल्याने प्रथम बौद्ध मंदिरात गेलो. (नागदीप विहारा टेंपल ) सोन्याची बुद्ध मूर्ति व पिंपळाचे झाड आहे.बरीच मंदिरे व स्तूप आहे. बुद्धाचे पाउल आहे.

तेथून १० मिनीटांवर हिंदूंचे नागदीप मंदिर आहे. (नैनातिवू बेट नाग पूशानी अंबल कोविल ) यात पुरूषांनी शर्ट काढून जायचे. येथे शंकराची पिंडी व नाग आहे. फोटो काढू देत नाही. आत फक्त तेलाचे दिवे असल्याने काही दिसत नाही. हे पार्वती चे मंदिर आहे असे गुगल वर वाचले.पार्वती चे anklets पैजण इथे पडले. हे इंद्राने पापक्षालनार्थ स्थापले व पार्वती अम्मा ची पूजा केली. मूळ मंदिर पोर्तूगीजां नी नष्ट केले. येथे हि बोटीचा थांबा आहे. बोटीत बसून परत कुरिकड्डूवान येथे आलो.

आज दुपारच्या जेवणासाठी एक व्हेज हॉटेल शोधले होते. तेथे हाss मोठा डोसा दिला होता. येथे छोट्या बादलीत चटणी व सांबार ठेऊन त्या टेबलवर ठेवतात. पाहिजे तितके घ्या.

आज चहा
साठी परत दाउद हॉटेल. सर्व मोगॅम्बो ला परत पाहून खुश होते. आमच्या मोगॅम्बो ची ड्यूटी संपली होती. तरी खुशीने त्याने काम केले.

रात्री ९ वाजता नाईस प्लेस हॉटेल, डम्बुला वर पौहोचलो.ही खूप छान प्राँपर्टी आहे. मागे जंगल आहे. पक्षी निरीक्षणासाठी उत्तम जागा. येथे वायफाय फार वीक होते. शिवाय फक्त रिसेप्शन मध्येच होते. आमचे टूर वाल्या साळुंकें ना नवीन बांधलेली लांबची रुम दिली होती. जंगला जवळ. पण नवीन असल्याने चहाची सोय नव्हती. हि पूर्ण लाकडाची फाँरिनर्स साठी सोयीची. ३०००० रू भाडे. रूम एकदम छान. जाता येता पक्षांचा किलबिलाट ऐकू येत होता.



Additional photos below
Photos: 14, Displayed: 14


Advertisement



Tot: 0.12s; Tpl: 0.011s; cc: 9; qc: 49; dbt: 0.0507s; 1; m:domysql w:travelblog (10.17.0.13); sld: 1; ; mem: 1.2mb